top of page

PRINCIPAL'S MESSAGE

  • महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलडाणा या महाविद्यालयाची स्थापना 8 ऑगष्ट 1993 रोजी झाली. जिल्हयातील एकमेव समाजकार्य उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचे स्थापनेपासुन आजपर्यत 29 वर्षात विविध क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातुन ग्रामिण शहरी आणि आदिवासी समुदायाबरोबरच औद्यागिक क्षेत्रात महाविद्यालयाने आपली ख्याती प्राप्त केली आहे. तसेच 1997 साली महाविद्यालयाच्या माध्यमातुन ‘प्रौढ शिक्षण’ कार्यक्रमाचे अंतर्गत मुल्यमापन करण्यात आले. पथनाटयाच्या माध्यमातुन स्त्रीभृण हत्या, हुंडा, मनोधैर्य, अंधश्रध्दा, रक्तदान,  नेत्रदान, एच.आय.व्हि.एडस, बेरोजगारी, व्यसनाधिनता, मतदान जागृती अशा सामाजिक समस्यांची जाणीव जागृती करण्यात येते. तसेच महाविद्यालयात सातत्याने नेहरु युवा केंद्र, महिला बाल विकास कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, समाज कल्याण, विविध मागासवर्गीय महामंडळ, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र अशा शासकीय संस्था सोबत सातत्याने कार्य करीत असते.

  • महाविद्यालयात सर्व प्राध्यापक सेट नेट तसेच पीएच.डी.धारक असुन यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व्यक्तिमत्व विकासासाठी होतो. तसेच प्राध्यापकांनी अनेक राज्यस्तर, राष्ट्रिय स्तर, तसेच आंतररार्ष्टीय स्तरावरील परिषदांमध्ये विविध समाजिक समस्यावरील संशोधन पेपर सादर झालेले आहेत. प्राध्यापकांची बहुमुल्य असे समाजकार्य अभ्यासक्रमावरील पुस्तके देखील प्रकाशित झालेले आहेत. 

  • समाजकार्य शिक्षणाचा लाभ बुलढाण्यातील अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनासुध्दा शिक्षणाची दारे खुली आहेत. बुलढाणा जिल्हयाच्या सामाजिक जडण घडणीमध्ये समाजकार्य महाविद्यालय एक माध्यम आहे. 

Principal.jpeg

Dr.Avinash A.Gedam

OUR OBJECTIVES

a. To create trained professional social worker.

b. To inculcate active, scientific and humanistic attitude in students to strengthen democracy. 

c. To create awareness among the students to face the challenges that arise.

d. To Provide Information and technology, educational and other facilities to students.

e. Students welfare tools using teachers 

knowledge.

f. inculcate value education in students along with higher education opportunities.

g.To develop the character and moral values of the students by increasing their participation in various social activities.

bottom of page